Friday, 2 October 2020

Marathi Essay on Mi Kridangan Boltoy", "मी क्रीडांगण बोलत आहे निबंध मराठी", "क्रीडांगणाचे मनोगत" for Students

Mi Kridangan Boltoy Essay in Marathi: In this article we are providing "क्रीडांगणाचे मनोगत निबंध मराठी", "मी क्रीडांगण बोलत आहे निबंध मराठी" for Students.

Marathi Essay on "Mi Kridangan Boltoy", "मी क्रीडांगण बोलत आहे निबंध मराठी", "क्रीडांगणाचे मनोगत" for Students

मित्रांनो, तुम्हाला मोठेपणी कोण व्हायला आवडेल? असा प्रश्न जर मी विचारला तर क्षणाचाही विलंब न लावता तुम्ही एका सुरात उत्तर दयाल, 'सचिन तेंडुलकर.' होय ना?

Marathi Essay on "Mi Kridangan Boltoy", "मी क्रीडांगण बोलत आहे निबंध मराठी", "क्रीडांगणाचे मनोगत" for Students

सचिन या नावानेच सगळ्या जगाला मोहिनी घातलीय! तोच सगळ्या तरुणांचा, बालकांचा आदर्श झालाय. त्याला हे स्थान आपोआप किंवा सहज मिळालेलं नाही बरं का! ते त्याने आपला उत्तम दर्जाचा खेळ दाखवून, नेत्रसुखद फटकेबाजी करून, क्रिकेटमधील वेगवेगळे उच्चांक मोडून मिळवलंय आणि एवढं असूनही त्याचे पाय जमिनीवर आहेत. (म्हणजे त्याला त्याचा गर्व नाहीये.)

अशा या गुणी खेळाडूचे पाय दिवसातील २४ तासांपैकी १८-१८ तास क्रिकेटच्या सरावासाठी माझ्या अंगाखांदयावर असायचे, हे किती जणांना ठाऊक आहे? त्याला मोठं करण्यात माझा सिंहाचा वाटा आहे बरं का!

म्हणूनच मला वाटतं, तुम्हा विद्यार्थ्यांना उंच-उंच इमारती, खेळण्यासाठी मैदानं नसल्यानं, माझ्याकडं म्हणजे शाळेच्या मैदानावर तुम्ही मनसोक्त खेळावं, बागडावं, मुक्त विहार करावा. तुम्ही आलात की, माझं मन आनंदानं भरून येतं. मी तुमच्या येण्याची वाट पाहत असतो. शारीरिक शिक्षणाच्या तासाला काही विद्यार्थी तर कोपऱ्यामध्ये घोळका करून चक्क गप्पा मारत बसतात आणि गप्पा कसल्या तर चित्रपट, नट-नट्या, दूरदर्शनवरील मालिका हे त्यांचे विषय.

शालेयजीवनात अभ्यासाबरोबरच खेळालाही फार महत्त्व आहे. म्हणूनच तर तुमच्या वेळापत्रकात पी.टी.चे तास असतात ना! मला माहीत आहे, शाळा, ट्यूशन्स, स्वीमिंग, डान्स, म्यूझिक क्लास, अगदीच काही नाही तर संस्कार वर्ग यामध्ये तुमच्या पालकांनी तुम्हाला अगदी जखडून टाकलंय त्यांच्या अपेक्षांचं ओझं पेलता पेलता तुम्ही अगदीच दमून जाता. हो ना? पण ते तरी काय करणार म्हणा, स्पर्धेच्या युगात तुमचा जन्म झालाय ना !

पण मित्रांनो, एक सुचवू? यंदाची वार्षिक परीक्षा संपली की, आईकडे केबल लावण्यासाठी हट्ट न करता मैदानांवर खेळांच्या मार्गदर्शनाची शिबिरे असतात ना तिथं प्रवेश घ्या. बघा, तुम्हाला खेळाची कशी आवड वाटायला लागेल. मैदानावर, मोकळ्या हवेत खेळण्याचे फायदेही अनेक आहेत. मग उत्तम, सुदृढ, निरोगी शरीर, निकोप मन, खिलाडूवृत्ती हे तुमचे दोस्त झालेच म्हणून समजा.

आज प्रत्येकालाच प्रदूषणाचा, कामाचा नाही तर अभ्यासाचा ताण सोसावा लागतोय.

रस्त्यावरून मुंग्यांसारखी चालणारी वाहने, त्यातून निघणारा कार्बनयुक्त धूर, झाडांची झालेली बेछूट कत्तल, त्याचा दुष्परिणाम म्हणून स्वच्छ, शुद्ध हवेचा अभाव, व्यायामासाठी काही जण व्यायामशाळेत जातात खरे; पण त्या बंदिस्त वातावरणात क्रीडांगणावर मिळणारी मोकळी, शुद्ध हवा थोडीच मिळणार?

आज तुमच्या पालकांची एकच तक्रार ऐकू येते की, आमची मुलं नीट जेवत नाहीत. सारखी कुरकुर करत असतात. त्या सर्वांवर एकच रामबाण उपाय आहे - तो म्हणजे मैदानावर मनसोक्त खेळणे. मग रात्री तुम्हाला सपाटून भूकही लागेल, मित्रांशी कसे प्रेमाने वागावे हेही कळू लागेल आणि झोपही छान लागेल.

तुम्हाला कदाचित माहीत नसेल, तुमचे आजी-आजोबा रोज प्रातःकाळी लवकर उठून इथं, माझ्याजवळ येतात. सूर्यनमस्कार, योगासने, प्राणायाम करतात. भरपूर चालतात. एवढंच नाही तर 'हास्य क्लब'मध्ये न लाजता मोठमोठ्याने हसतात आणि दिवसभरासाठी शुद्ध हवा आणि उत्साह भरून घेतात.

'शक्तीने पावती सुखे । शक्ती नसता विटंबना - समर्थ रामदासांनी हे जाणलं होतं. म्हणूनच तुम्हा युवकांसाठी शक्तीचा गौरव करत जागोजागी शक्तीची देवता म्हणून हनुमानाची मंदिरे स्थापून त्याच्या शेजारीच कुस्तीचे आखाडे बांधून घेतले. रात्र-रात्र जागून, अभ्यास करून तुम्हाला हवं ते ध्येय तुम्ही प्राप्त करताही! पण जे सुख मिळवाल ते सुख उपभोगायला शरीरच निरोगी नसेत तर?

म्हणून म्हणतो, दिवसातील थोडा वेळ तरी माझ्यासाठी काढा, तुमचे सगळे ताणतणाव पळून जातील की नाही ते पहा. तुमच्यामध्ये लपलेल्या खिलाडूवृत्तीला मी जागं करीन आणि चांगल्या, गुणी, निर्व्यसनी मित्रांची सोबत तुम्हाला कायमची देईन, हा माझा शब्द आहे.


SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

0 Comments: