Sunday, 11 October 2020

Marathi Essay on "Electronic Waste", "ई कचरा व्यवस्थापन मराठी निबंध", "E Kachra Ek Gambhir Samasya in Marathi" for Students

Essay on Electronic Waste in Marathi: In this article "ई कचरा व्यवस्थापन मराठी निबंध", "E Kachra Ek Gambhir Samasya in Marathi" for students of class 5, 6, 7, 8, 9, and 10.

Marathi Essay on "Electronic Waste", "ई कचरा व्यवस्थापन मराठी निबंध", "E Kachra Ek Gambhir Samasya in Marathi" for Students

Marathi Essay on "Electronic Waste", "ई कचरा व्यवस्थापन मराठी निबंध", "E Kachra Ek Gambhir Samasya in Marathi" for Students

तन्वी, तुझा फोन खराब झालाय का? मी कालपासून प्रयत्न करतेय लागतच नाहीये. “हो ना गं ताई, टाकून द्यायला हवा. दोन वर्षांतच खराब झालाय!"

"बाबा, आपण शेजारच्या दादासारखा मोठ्ठा एल. ई. डी. टीव्ही घेवूया ना या दिवाळीत! आपला टीव्ही किती जुना, Old फॅशनचा झालाय."

"अहो, आपण आपला फ्रीज बदलूया ना! जुना झालाय. नाही का? परवा दुकानात किती छान छान क्रीज होते, नाही? आपला फ्रीज बिघडला नाही, पण एक्स्चें ज ऑफरमध्ये देता येईल.”

हे आणि असे संवाद हल्ली घरोघरी ऐकायला मिळतात. हो ना? जागतिकीकरण आणि आधुनिक तंत्रज्ञानाने अनेक समस्या निर्माण झाल्या. 

नवीन वस्तू घेताना जुन्या वस्तूचं काय? कागदाची रद्दी देऊन आपण पैसे घेऊ शकतो. कारण त्याचा पुनर्वापर करता येतो; पण काही गोष्टी अशा असतात की, त्याचा पुनर्वापरच करता येत नाही. त्याला 'ई' कचरा म्हणतात. 

जसं की फ्रीज, चार्जर, टीव्ही, रेडिओ, एअर कंडिशनर, मायक्रोवेव्ह, ओव्हन, फ़ूड प्रोसेसर, सीडी, डीव्हीडी प्लेअर, कूलर, पंखे, कॉम्प्युटर, त्याचे वेगवेगळे भाग, लॅपटॉप, प्रिंटर, स्कॅनर, इन्व्हर्टर, मोबाइल, टेपरेकॉर्डर, मिक्सर हे आणि अशा इलेक्ट्रॉनिकच्या कितीतरी वस्तू.

प्लॅस्टिक आणि 'ई' कचरा विघटित होत नाही. त्यापासून धोका होऊ शकतो. त्याच्यामुळे पर्यावरणालाही धोका असतो.

अलीकडे आपण प्लॅस्टिक बेसुमार वापर करू लागलो आहोत. प्लॅस्टिक पिशव्या नदीपात्रात वाहत्या पाण्यासाठी अडथळा ठरतात. पाणी न वाहण्यामुळे पुरस्थिती निर्माण होऊन आजूबाजूच्या लोकांना धोका पोहोचू शकतो.

'ई' कचरा निःसारण करण्यासाठी मुंबई म.न.पा.ने इको रिसायकलिंग लिमिटेड नावाची 'ई' कचरा व्यवस्थापन कंपनी स्थापन केली. या कंपनीने 'ई' कचरा जमा करण्याचे आवाहन नागरिकांना केले.

'ई' कचऱ्याची विल्हेवाट तीन टप्प्यात होते. वापर कमी करणे, त्याचा पुनर्वापर करणे आणि रिसायकल करणे. 

'ई' कचऱ्याची विल्हेवाट लावताना एखादा भाग पुन्हा वापरण्यायोग्य असेल तर तो बाजूला काढून संबंधित कंपनीकडे पाठवला जातो.

इलेक्ट्रॉनिक वस्तूंची तोडफोड करून त्याचे लोखंडी भाग, कचा, प्लॅस्टिकचे भाग, थर्माकोल इ. वेगळे करतात आणि प्रत्येक रिसायकलिंग कंपन्यांकडे ते ते पाठवले जातात.

जगामध्ये भारत 'ई' कचरा निर्मितीमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. केवळ महाराष्ट्राचा विचार करायचा झाल्यास राज्यात दरवर्षी सुमारे ५० हजार टन ई' कचरा तयार होतो. मात्र इतक्या प्रचंड 'ई' कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक साधनसामग्री आपल्याकडे उपलब्ध नाही. त्यामुळेच केवळ २४ हजार टन 'ई' कचऱ्यावर पुनःप्रक्रिया केली जाते.

'ई' कचऱ्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. 'ई' कचऱ्याची विल्हेवाट लावताना तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना श्वसनाचे आणि त्वचारोग होण्याची शक्यता असते; कारण शिसे, पारा, अल्कली धातू, सेलिनिअम, झिंक सल्फाइड, क्रोमिअम, गॉलियम आर्सेनाइल, बेरिअम, बेरिलिअम असे हानिकारक घटक तिथे असतात.

चला तर मग, आजपासून आपण प्लॅस्टिकचा वापर शक्यतो टाळूया! 'ई' कचरा संग्रहण केंद्रातच 'ई' कचरा जमा करूया आणि 'स्वच्छ, सुंदर भारत' हा उपक्रम यशस्वी करूया!


SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

0 Comments: