Marathi Essay on "Teenage Problems", "किशोरवयीन मुलांच्या समस्या व उपाय मराठी निबंध", "Kishorvayin Mulinche Mahiti" for Students

Admin
0

Essay on Teenage Problems in Marathi: In this article "किशोरवयीन मुलांच्या समस्या व उपाय मराठी निबंध", "किशोरवयीन मुला मुलींना समजून घेताना मराठी निबंध" Kishorvayin Mulinche Mahiti for students of class 5, 6, 7, 8, 9, and 10.

Marathi Essay on "Teenage Problems", "किशोरवयीन मुलांच्या समस्या व उपाय मराठी निबंध", "Kishorvayin Mulinche Mahiti" for Students

वृत्तपत्रातील बातमी वाचली आणि मन हादरून गेलं. 'मोबाइल' घेण्यास नकार दिल्याने एका अल्पवयीन मुलीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. 

Marathi Essay on "Teenage Problems", "किशोरवयीन मुलांच्या समस्या व उपाय मराठी निबंध", "Kishorvayin Mulinche Mahiti" for Students

वारंवार अशा घटना आपण वर्तमानपत्रांतून वाचतो. हिरो/ हिरोइन होण्यासाठी घरातून पळून जाणारी मुले, अभ्यासात अपयश आले म्हणून आत्महत्या करणे, सिनेमा पाहण्यासाठी घरातून चोरी करणे, घरच्याच गाडीतील पेट्रोल चोरून विकणे, प्रियकराशी लग्न लावून देतील की नाही या भीतीने पळून जाणे किंवा जीव देणे, घरात न सांगता सहलीला/ मैत्रिणींकडे जाणे.

का असं घडत असेल समाजात? वरील सर्व उदाहरणात आपल्या लक्षात येईल की, ही मुले Teenage (किशोरवयीन) आहेत. पालक मुलांना वेळ देऊ शकत नाहीत म्हणून त्यांनी मागितलेल्या वस्तू आदी ते चटकन पुरवतात. पालकांच्या मनात अपराधीपणाची भावना असते, त्याचा पाल्यांना सुगावा लागलेला असतो.

पालक मुलांच्या भावनिक गरजांकडे दुर्लक्ष करत असतील, तर मुलांची अस्मिता दुखावली जाते. 

आजकाल मुलांमधील हिंसकपणा वाढत चालला आहे. कुटुंबात एखादी समस्या किंवा हिंसकपणा असेल तर मुलेही हिंसक होण्याचा संभव असतो. चित्रपट, दूरदर्शन यातूनही मुलांवर परिणाम होत असतो. अर्थात चित्रपट, दूरदर्शन हे समाजप्रबोधनही करण्याचा प्रयत्न करत असतात; पण चांगल्या गोष्टी मनावर बिंबायला वेळ लागतो, त्या प्रमाणात वाईट गोष्टी चटकन आत्मसात केल्या जातात. मुले अनुकरणप्रिय असतात. लोकसभा, विधानसभा. नगरपालिका इ. ठिकाणी लोकप्रतिनिधी आपापसात कसे वागतात (मारामाया करणे, चपला-बूट फेकून मारणे, माईक फेकणे, तोडफोड करणे इ.) हे दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपित झाल्याने ते मुले पाहतातच!

शाळेतील रखवालदारानेच अल्पवयीन मुलींना मोबाइलवर अश्लील चित्रफीत दाखवल्यास रक्षक कसे भक्षक होतात, याचे उदाहरण मुलांसमोर असते. लैंगिक अत्याचार ही अत्यंत संवेदनशील बाब आहे.

मुलांकडून अवाजवी अपेक्षा आणि अनाठायी शिस्तीचे प्रयोग पालकांसाठी डोकेदुखी ठरते. मुलांच्या मनात भीती, कडवटपणा, अशा नकारात्मक भावना उत्पन्न होतात.

प्रत्येक मुलाचे वर्तन वेगवेगळे असू शकते. आपले मूल असेच का वागते, याचा पालकांनी विचार करायला हवा. कारण कार्यकारणसंबंध असतोच.

सतत आरशासमोर उभे राहणे, मनातील राग वस्तूंची तोडफोड करून व्यक्त करणे, विषम लिंगी आकर्षण, शारीरिक बदल, घरातील मोठ्यांचा अपमान, उलट उत्तरे देणे, बोलणे, चोरी करणे, एकटेपणा नकोसा होणे, बंधने नकोशी वाटणे अशा अनेक गोष्टी/ समस्यांना किशोरवयीन मुले सामोरी जात असतात. याच वयात मुले भयंकर चुकाही करतात. 

अशावेळी त्यांना समजून घेणं, त्यांच्यातील 'मी'वर प्रेम करणं, तू आमचा आहेस, तू जसा आहेस तसा आम्हाला हवा आहे असा विश्वास दाखवणं गरजेचं असतं.

दुःख, नैराश्य, ताण याविरुद्ध त्यांची प्रतिकारक्षमता जाणीवपूर्वक वाढवायला हवी. रागावर नियंत्रण ठेवायला आधी आपण शिकले पाहिजे. आपण प्रयत्नपूर्वक चांगले वागले पाहिजे. घरातील मोठ्यांचा आदर आपण केला तर मुले आपला आदर ठेवतील ना! मुलांसमोर भांडू नये. कारण घरातील, समाजातील आजूबाजूच्या परिस्थितीतूनच 'मूल' घडत असते.

मुलांना 'घडवा.' खरं तर तुमची संपत्ती तुमची मुले! पण सोन्याच्या हव्यासापायी सोन्यासारख्या मुलांकडे दुर्लक्ष होते. हीच 'घडलेली' मुलं तुम्हाला भविष्यात सोन्याने मढवतील. अनेक आदर्श व्यक्ती मिळून आदर्श, सशक्त समाज घडतो.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !