Essay on My Grandfather in Marathi Language : Today, we are providing माझा दादा मराठी निबंध For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. ...
Essay on My Grandfather in Marathi Language : Today, we are providing माझा दादा मराठी निबंध For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Essay on My Grandfather in Marathi Language to complete their homework.
माझा दादा मराठी निबंध - My Grandfather Marathi Essay
नववीत असलेला माझा सौरभदादा म्हणजे माझा आदर्श आहे. मी नेहमी त्याच्यासारखे वागण्याचा व बोलण्याचा प्रयत्न करत असतो.
माझा दादा अभ्यासात खूप हशार आहे. माझ्या अभ्यासात मला त्याची खूप मदत होते. मी त्याला अभ्यासातील कोणतीही शंका विचारली तरी तो न कंटाळता मला तो विषय छान समजावून देतो. Read also : Maza avadta shikshak Marathi Essay
इतर कलाकुसरीच्या कामातही माझा दादा नेहमी पुढे असतो. आमच्या चाळीतील गणेशोत्सवात गणपतीचे मखर तयार करणे, इतर सजावट करणे, दिवाळीत आकाश कंदील बनवणे वगैरे सर्व गोष्टीही तो अतिशय छान करतो. त्याच्याकडून या सर्व गोष्टी शिकून घ्याव्यात असे मला वाटते. म्हणून माझी सतत त्याच्या मागे लुडबूड चालू असते. Read also : Majhi Aaji Nibandh Marathi
पण माझा दादा कधी कधी मात्र माझ्यावर भयंकर संतापतो. त्याच्या कोणत्याही वस्तूला त्याच्या नकळत मी हात लावलेला त्याला खपत नाही. तसेच त्याची मित्रमंडळी जमली असताना मी तेथे लुडबूड केलेलीही त्याला आवडत नाही. अशा वेळी तो एकदम रुद्रावतार धारण करतो. Read also : Majhi Aai Marathi Nibandh Lekhan
पण असे काही मोजके प्रसंग सोडले, तर एरवी माझा दादा खूपच प्रेमळ आहे. मी लहान भाऊ असल्यामुळे मला सांभाळून घेण्याचे काम तो नेहमीच करतो. अशा या माझ्या सौरभदादाचा मला खूपच अभिमान वाटतो.
This Essay was Provided by Bookganga.com. Guys if you wanna buy marathi essay book, then do visit their website.
This Essay was Provided by Bookganga.com. Guys if you wanna buy marathi essay book, then do visit their website.
COMMENTS