Wednesday, 18 September 2019

माझे घर मराठी निबंध - Essay on My House in Marathi Language

Essay on My House in Marathi Language : Today, we are providing माझे घर मराठी निबंध For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Maza Ghar Nibandh in Marathi OR Essay on My House in Marathi Language to complete their homework.

माझे घर मराठी निबंध - Essay on My House in Marathi Language

'घर' हा एक छोटासा दोन अक्षरी शब्द आहे. पण प्रत्येकाच्या मनात घराला एक स्वतंत्र स्थान असते. आपल्या घरात आपण हक्काने विश्रांती घेऊ शकतो.

माझे घरही खूप छान आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील एका चार मजली भक्कम इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावर माझे घर आहे. खेळती हवा व पुरेसा उजेड यामुळे माझ्या घरातील वातावरण आरोग्यदायी व उत्साह वाढवणारे आहे. Read also : Majhi Aaji Nibandh Marathi

माझे घर आटोपशीर व सर्व सोयींनी युक्त आहे. बाहेरच्या बैठकीच्या खोलीतून आत गेल्यावर एका बाजूला शयनगृह, तर दुसऱ्या बाजूला आम्हा भावंडांची अभ्यासाची खोली आहे. दुसऱ्या टोकाला आमच्या पोटाचे लाड पुरवणारे स्वयंपाकघर आहे. स्वतंत्र स्वच्छतागृह, स्नानगृह अशा सोयीही माझ्या घरात आहेत. Read also : Majhi Aaji Essay in Marathi Language

आमच्या घराला दोन प्रशस्त बाल्कन्या आहेत. त्यामध्ये आम्ही हौसेने विविध प्रकारची फुलझाडे लावली आहेत. त्यांच्या सुवासाने घर भरून गेले की आमची मने अधिकच प्रफुल्लित होतात. Read also : माझी आई निबंध मराठी

आमचे घर आम्ही नेहमी स्वच्छ, व्यवस्थित व नीटनेटके ठेवतो. पण घराला घरपण लाभते ते त्यात राहणाऱ्या माणसांमुळेच होय. माझ्या घरातील सर्व माणसे एकमेकांशी प्रेमाने व आपुलकीने वागतात. त्यामुळेच माझ्या घराला खरी शोभा येते. असे हे माझे घर मला खूपच आवडते. Read also : Majhi Aai Marathi Nibandh Lekhan

This Essay was Provided by Bookganga.com. Guys if you wanna buy marathi essay book, then do visit their website.

SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

0 comments: