Sunday, 16 December 2018

रवीन्द्रनाथ टैगोर मराठी माहिती, निबंध। Rabindranath Tagore Essay in Marathi

रवीन्द्रनाथ टैगोर मराठी माहिती, निबंध। Rabindranath Tagore Essay in Marathi

ज्यांना गुरुदेव असे ही संबोधले जाते, हे एक ब्राह्मो पंथीय, चित्रकार, नाटककार, कादंबरीकार,बंगाली कवी,संगितकार होत. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात २०व्या शतकाच्या प्रारंभी यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्यात बंगाली संगितात एक आमूलाग्र बदल घडून आला. रवींद्रनाथ हे भारताचे आशियाचे पहिले नोबेलविजेते होत.

Rabindranath Tagore Essay in Marathi
कोलकात्याच्या पिराली ब्राह्मण कुटुंबात  जन्म झालेल्या रवीन्द्रनाथांनी प्रथम कविता वयाच्या ८व्या वर्षी लिहिली. वयाच्या १६व्या वर्षी त्यांनी भानुसिंह या टोपणनावाने -याचशा कविता लिहिल्या. शांतीनिकेतनाची उभारणी, विस्तृत उच्च दर्जाच्या साहित्याची निर्मिती रवीन्द्रसंगीताचे सृजन हे रवीन्द्रनाथांचे प्रमुख जीवनकार्य होय. रवीन्द्रनाथांनी रचलेली जन गण मन आमार शोनार बांग्ला ह्या रचना अनुक्रमे भारत बांग्लादेश यांची राष्ट्रगीते म्हणून स्वीकारण्यात आल्या आहेत. दोन राष्ट्रगीतांचे जनकत्व असलेले रवीन्द्रनाथ हे पृथ्वीवरील एकमेव कवी आहेत. पारंपारिक शिक्षण केवळ पोपटपंची शिकवते या विचारातून शांतिनिकेतनाचा क्रांतिकारक प्रयोग त्यांनी राबवला.

कोलकात्याच्या जोराशंका ठा़कूर बाडी येथे रवींद्रनाथ टागोर (टोपणनावः रवि) यांचा जन्म झाला. वडील देवेन्द्रनाथ टागोर(१८१७-१९०५) आई शारदा देवी (१८३० - १८७५) यांच्या १४ अपत्यांमध्ये रवींद्रनाथ हे १३वे होत.११व्या वर्षी मुंज झाल्यावर रवींद्रनाथांनी वडीलांसोबत १४ फेब्रु. १८७३ रोजी भारतभ्रमणार्थ कलकत्ता सोडले.

कारवार येथील सृष्टीसौन्दर्यामुळे रवींद्रनाथांना आपल्या पहिल्या नाटकाची प्रेरणा मिळाली  छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनही त्यांच्या साठी प्रेरणास्थान होते. छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांनी एक खंडकाव्यही रचले आहे. रविन्द्रनाथांचा नेता क्रांतीकारक या रुपात भारतीय स्वातंत्र्य संग्रामात थेट सहभाग नव्हता म्हणून त्यांच्या संस्कृतीपिपासू वृत्त्तीमुळे त्यांच्यावर महाराष्टात टीका झाली होती. रविन्द्रनाथांच्या व्यक्तीमत्वाने काही महाराष्ट्रीयही प्रभावित झाले होते. रवीन्द्रसाहित्य मुळ बंगालीतून वाचण्याच्या इच्छेने पु..देशपांडे यांनी बंगाली भाषा शिकली. मराठी कानडी भाषेत लेखण केलेले कानडी भाषेतील आधुनिक साहित्यातील सर्वश्रेष्ठ कवी जन्माने महाराष्ट्रीय असलेल्या .रा.बेन्द्रे यांच्या साहित्यावरही रविंद्रनाथांचा प्रभाव आहे.

पारंपारिक हैदा कोरिवकाम शैलीतील बंगाली लिपीतील रवींद्रनाथांची आद्याक्षरे "-" रवींद्रनाथ स्वतःची हस्तलिखिते अनेकदा अशा कलेने सजवत असत.

संगीत,साहित्य, तत्वज्ञान, चित्रकला ,नृत्य,शिक्षण अशा बहुविध क्षेत्रात रविंद्रनाथांनी संचार केला. संख्या दर्जा या दोन्ही कसोट्यांवर रविंद्रनाथांची निर्मिती उतरते.

रविंद्रनाथाच्या बहुमुखी निर्मितीत कविता जरी प्रमुख असली तरी त्यांनी कादंब-या, निबंध, लघुकथा, प्रवासवर्णने, नाटके अशा बहुविध साहित्याची निर्मिती केली.यमकयुक्तता, आशावाद गेयता ही त्यांच्या कृतींची प्रमुख वैशिष्ट्ये. कवितेनंतर रविंद्रनाथांची लघुकथा प्रमुख रचना मानली जाते.रविंद्रनाथ हे बंगाली भाषेतील आद्य लघुकथाकार. सामान्य माणसांचे जीवन हा त्यांच्या कथांचे कथाबीज आहे.

गल्पगुच्छ'(कथागुच्छ) नावाचा रवींद्रनाथांचा ८४ लघुकथांचा खंडी संग्रह प्रसिद्ध आहे. आजूबाजूचा परिसर,आधुनिक कल्पना बौद्धिक कूटप्रश्नांचा वेध घेण्याचा प्रयत्न टागोर यांतून करतात. 'काबुलीवाला' या सुप्रसिद्ध प्रथमपुरुषी कथेत दूरदेशी असलेल्या आपल्या मुलीची आठवण कशी येत राहते हे अफगाण फळवाल्याच्या तोंडून टागोर सांगतात.

राजकीय मते
चरखा-पंथी असे संबोधून त्यांनी तत्कालिन स्वदेशी चळवळीची खिल्ली उडवली होती. ब्रिटिश साम्राज्यवादापेक्षाही 'सामाजिक अनारोग्य' त्यांना मोठा शत्रु वाटत असे. स्वयंसहायता सर्वसामान्यांचा बौद्धिक उद्धार आदींवर त्यांचा जास्त भर होता. आंधळ्या क्रांतीपेक्षा सावकाश होणा-या शैक्षणिक उत्क्रांतीवर त्यांचा जास्त विश्वास होता. या मतांमुळे रवींद्रनाथांना शारिरिक हल्ल्यांना सामोरे जावे लागले. १९१९ च्या जालियनवाला बाग हत्यांकाडाचा निषेध म्हणून त्यांनी ब्रिटिश सरकारची सर्वोच्च पदवी परत केली. टागोरांनी रचलेली 'एकला चलो रे' 'चित्त जेथा भयशून्य' ह्या दोन कविता भारतीय स्वातंत्र्य संग्रामात प्रेरणा गीते म्हणून वापरण्यात आल्या. महात्मा गांधींशी मतभेद असतानाही स्वतंत्र मतदारसंघाविषयी असलेला गांधी-आंबेडकर वाद मिटवण्यात त्यांनी पुढाकार घेतला.

प्रभाव वारसा
रवींद्रनाथांचा प्रभाव दाखवणारे अनेक समारंभ जगभरात होत असतात. बंगालमध्ये त्यांच्या जोराशंका ठाकुर बाडी येथे पुण्यतिथीस मोठा उत्सव होतो. अमेरिकेतील इलिनॉय येथे त्यांच्या स्मृतीपीत्यर्थ वार्षिकोत्सव होतो. रवींद्रनाथांमुळे प्रभावित व्यक्तीमत्वांत अमर्त्य सेन, ऍन्द्रे गिडेल (फ्रान्स), यसुनारी कावाबाता (जपान) आदी नोबेल विजेते, याशिवाय सलमान रश्दी , पाब्ले नेरुदा यांचा समावेश आहे. रवींद्रनाथांचे साहित्य जगभरातील अनेक भाषांमध्ये अनुवादित झाले आहे.

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे , विख्यात भारतीय चित्रकार नंदलाल बोस यांच्या जडणघडणीवर रवींद्रनाथांचा प्रभाव आहे.

SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

0 comments: